ब्रेकिंग न्युज...
चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान कडून येणाऱ्या कार ची 2 दुचाकींना जोरदार धडक ; जखमी ना रुग्णालयात भरती.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
गडलिरोली : आज दिनांक,7/12/2024 शनिवार ला अंदाजे 2:00 वा.सेमाना देवस्थान कडून येणाऱ्या हुंडाई कंपनी ची कार क्र.MH - 33 V 3510 ची दुचाकी क्र.C.B.JET होंडा क्र.MH - 33 Y 3470 व ऍक्टिव्हा MH - 33 H 8370 या दुचाकीना जोरदार धडक बसली.
सविस्तर वृत्त असे की चामोर्शी कडून कार भरधाव वेगाने गडचिरोली च्या दिशेने येत होती व दोन्ही दुचाकी गडचिरोली कडून चामोर्शी कडे जात होते.
गडचिरोली कडे येतांना सेमाना जवळील पहिली टर्निंग समोर समोरासमोर जोरदार धडक होऊन ऍक्टिव्हा रोड वर पडली तर दुसरी रोडच्या साईडला झुडपात पडली.धडक जोरदार बसल्याने दोन्ही दुचाकी चकनाचूर झाले.जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे भरती करण्यात आले असून नावे कळू शकले नाही.
गडचिरोली ते चामोर्शी रोड या राष्ट्रीय महामार्गावर रोड च्या साईडला झुडपी झाड असल्याने वळणावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसत नसल्याने नेहमीच अपघाताची मालिका सुरू आहे.संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.
पुढील तपास गडचिरोली पोलीस स्टेशन चे गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सिंजनगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अधिक तपास करत आहेत.