मुल येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.
ग्राहक संरक्षण अधिनियमात समाविष्ट हक्काची माहिती मिळवून आपली फसवणूक टाळता येऊ शकते. - अजय चरडे उपविभागीय अधिकारी,मुल
आनंदराव कुळे - मूल शहर प्रतिनिधी
मुल : कोणत्याही ग्राहकाला ग्राहक संरक्षण अधिनियमात समाविष्ट हक्काची माहिती मिळवून आपली फसवणूक टाळता येऊ शकते असे प्रतिपादन मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमातून उपस्थितांना केले.
मूल प्रशासकीय भवनातील सभागृहात तहसील कार्यालय मूल आणि ग्राहक पंचायत मूल यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम नुकताच पार पडला,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अजय चरडे हे होते तर कार्यक्रमाला मूलच्या तहसीलदार मृदूला मोरे, ग्राहक पंचायत मूल चे तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे, सचिव रमेश डांगरे, तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार, पुरवठा निरीक्षक राजेश शिरभाते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्राहक संरक्षण अधिनियमात समाविष्ट हक्काची माहिती मिळवून आपली फसवणूक टाळता येऊ शकते. - अजय चरडे उपविभागीय अधिकारी,मुल
वस्तूंसोबत सेवाही या कायद्यात समाविष्ट, असल्याने दाद मागण्याचा हक्क. - तहसीलदार मृदूला मोरे
ग्राहक आपल्या अधिकारांप्रती जागरुक नाही आणि म्हणूनच फसवणूक. - दीपक देशपांडे,अध्यक्ष ग्राहक पंचायत मुल
विविध उदाहरणांसह ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार वस्तू व सेवा घेतल्यानंतर काही त्रुटी आल्या तर त्याविरुद्ध दाद मागता येते हे आवर्जून सांगताना ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही अजय चरडे सरांनी आपल्या वक्तव्यात नमुद केले.
तर ग्राहक दिनाचे औचित्य आणि ग्राहक संरक्षण कायदा याबाबत दीपक देशपांडे यांनी इतकी विस्तृत माहिती दिली आहे की त्याबाबत वेगळे बोलण्याची गरजच नाही मात्र ग्राहक हितासाठी बदललेल्या नवीन कायद्यानुसार वस्तूच नाही तर वेगवेगळ्या सेवासुविधा सुद्धा या कायद्याच्या चौकटीत आल्या असून प्रत्येक सेवा मिळविण्यासाठी एक ठराविक कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
परिणामी त्याविरुद्ध प्रत्यक्ष वा आँनलाईन तक्रार करीत दाद मागण्याची सुविधाही या कायद्याद्वारे उपलब्ध झाली आहे याबाबत जनतेला पुढे येत तक्रार करुन न्याय मिळवता येतो,हे समजून घेतले पाहिजे असे प्रतिपादन मूलच्या तहसीलदार मृदूला मोरे यांनी आपल्या प्रबोधनातून स्पष्ट केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना ग्राहक पंचायत मूल तालुका सचिव रमेश डांगरे यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम अस्तित्वात आल्यापासून त्याचा प्रवास आणि ग्राहक फसवणुकीच्या विविध प्रकाराबाबत सविस्तर माहिती सादर केली, आणि फसवणूक टाळण्यासाठी सजगता बाळगण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.
ग्राहक पंचायत मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी ग्राहक म्हणजे काय, ग्राहक हक्कासाठी लढा देत उभारलेली संघटना ते ग्राहक संरक्षण कायदा, निर्माण करण्याची गरज आणि त्याचा पूर्वेतिहास, ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व उद्देश यांपासून ते वस्तू खरेदी आणि बदललेले स्वरूप आणि फसवणुकीच्या बदललेल्या आणि वाढिस लागलेल्या तक्रारी या परिस्थितीत कायद्याचे ही बदललेले स्वरूप आणि तक्रार दाखल करण्यासाठी उपलब्ध सोयीसुविधा अगदी आपल्या हातात कशा आल्या आहेत.
मात्र ग्राहक आणि ग्राहकांच्या या कायद्याबाबत अज्ञानामुळे फसवणूक झाल्यानंतर ओरड करण्यापेक्षा खरेदीपूर्वी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत घुगरे मॅडम यांच्या ग्राहक गीतगायनाने करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागताने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसील कार्यालयातील लिपिक गजभिये मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरवठा विभागातील लिपिक बनकर यांनी केले. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, सदस्य, रेशन दुकानदार, कर्मचारी तसेच महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या निमित्ताने वजनमाप विभागातील अधिकारी दीपक दंडारे यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून वजनमाप विभागातील कार्याबाबत माहिती दिली. ग्राहकांच्या वजनमापांतील तफावतींबाबत असंख्य तक्रारी असल्यामुळे विभागाने एक धडक मोहीम राबविण्याची आवश्यकता ग्राहक पंचायत मूल तालुका शाखेने व्यक्त केली व वजनमापांबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी केली.