पोंभूर्णा तालुक्यातून चालते गोवंश तस्करी ; पोलिसाचे दुर्लक्षकंटेनर,आयशर,पिकअप ने तस्करी.

पोंभूर्णा तालुक्यातून चालते गोवंश तस्करी ; पोलिसाचे दुर्लक्षकंटेनर,आयशर,पिकअप ने तस्करी.


राहुल सोमनकार - तालुका प्रतिनिधी


पोंभूर्णा : तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.यात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.कंटेनर,आयशर,पिक अप चा वापर करून गोवंश तस्करी सरार्स केली जात आहे.मात्र पोलिस विभागाकडून कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे.


पोंभूर्णा तालुक्यातून होत असलेली गोवंश तस्करी रोकण्यात यावी व तस्करांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय गोरक्षा संघ किसान सभा चे जिल्हा कोषाध्यक्ष तथा शिवसेना बल्लारपूर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर यांनी केली आहे.


पोंभूर्णा तालुका गोवंश तस्करी करण्यासाठी सुरक्षीत असल्याने तस्करांनी थेरगाव मार्ग,डोंगर हळदी मार्ग,नवेगाव मोरे मार्ग, ठाणेवासना मार्गाचा वापर करून गोवंश तस्करी करीत आहेत.कंटेनर,आयशर,पिक अप गाड्यांचा वापर करून गायींना व गोवंशाला दाटीवाटीने दोरीने बांधून कत्तलीसाठी घेऊन जात असतात.


सोईनुसार तस्करी करता यावी यासाठी तस्कर आधी कारने निगराणी राखायला पुढे येऊन असतात.सकाळी 4 वाजता च्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देऊन भरधाव 15 ते 20 गाड्या भरून गोवंश तस्करी केली जाते.


पोंभूर्णा तालुक्यातील थेरगाव,डोंगर हळदी,नवेगाव मोरे,ठाणेवासना मार्गाने गोवंश तस्करी होत असताना सुद्धा पोलिस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शिवाय नांदगाव येथे शुक्रवारला भरणाऱ्या बैलबाजारातूनही गोवंश तस्करी केली जात आहे.यात तस्करांनी पिक अप चा वापर करतात तर काही रोजीचे माणसं लावून पायदळी गोवंश घेऊन महाराष्ट्राची सीमा पार करून देतात.


यात गोंडपिपरी व गडचांदुर येथील तस्कर असल्याची माहिती आहे.गोवंश तस्करी रोखण्यासाठी व तस्करांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय गोरक्षा संघ किसान सभा चे जिल्हा कोषाध्यक्ष तथा शिवसेना बल्लारपूर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर यांनी केली आहे.


बुधवार,गुरूवार,शुक्रवार, रविवार,सोमवार या दिवसात पहाटे साधारण 4:00 वा.च्या सुमारास पोंभूर्णा तालुक्यातून गोवंश तस्करी केली जाते.गोवंश तस्करी करतांना रोजीचे माणसं व लहान मुलांचाही वापर केल्या जाते.पैदल गोवंश घेऊन जाण्यासाठी माणसांना व मुलांना पाचशे रुपये रोजी व दोन टिल्लू असे मेहनताना दिला जातो.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !