आश्रम शाळा जांभूळघाट येथील पाच खेळाडू विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड.

आश्रम शाळा जांभूळघाट येथील पाच खेळाडू विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड.


एस.के.24 तास


चिमुर : नुकत्याच तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत आश्रम शाळा जांभुळघाट येथील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 


पूरब वरखडे थाळीफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारात विभागावर द्वितीय क्रमांक पटकावून पोलीस ग्राउंड नागपूर येथे दिनांक 3 जानेवारी ते 5 जानेवारी 2024 दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. 


तर सेजल मानकर व शुभम गायकवाड खो खो या सांघिक क्रीडा प्रकारात,प्रियांका खाटे व गणेश मुंढरे हँडबॉल या सांघिक क्रीडा प्रकारात आपले स्थान निश्चित केले आहे. खेळाडू विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रशांत गिरी व क्रीडा विभाग प्रमुख निवृत्ती पिसे,शाळेचे संघ व्यवस्थापक.विशाल आडे व शाळेतील इतर सर्व शिक्षकांनी कौतुक केले व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !