तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत आश्रम शाळा जांभूळघाट चे विद्यार्थी चमकले.
एस.के.24 तास
चिमूर : पंचायत समिती चिमूर अंतर्गत शिवाजी पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज भिसी येथे दिनांक 26 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 दरम्यान घेण्यात आलेल्या 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत माध्यमिक विभागातून आदिवासी गटातून शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जांभुळघाट येथील विद्यार्थ्यांच्या हायड्रोफोनिक फार्मिंग विषयाच्या प्रयोगाला द्वितीय क्रमांक मिळाला.विज्ञान शिक्षिका दिपाली नन्नावरे यांच्या मार्गदर्शनात संजीवनी कुंभरे व तन्वी गायकवाड या विद्यार्थिनींनी प्रयोगाचे सादरीकरण करून डॉ. रमेशकुमार गजभे यांच्या शुभहस्ते विद्यार्थिनींनी बक्षीस स्वीकारला.
विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत गिरी व इतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.