नांदगाव( जाणी) येथे मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचे आयोजन.


नांदगाव( जाणी) येथे मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचे आयोजन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपूरी -२२/१२/२४ मौजा नांदगाव  (जाणी) येथील ग्रामपंचायत च्या पटांगणामध्ये माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशांवर तालुका विधी सेवा समिती, ब्रह्मपुरी यांचे वतीने मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री.डी.बी.गुट्टे साहेब,तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी ब्रह्मपुरी हे हजर होते.


या कार्यक्रमाला Motivational मार्गदर्शक म्हणून ब्रह्मपुरी बार असोशियन चे अध्यक्ष  एडवोकेट हेमंत उरकुडे साहेब ,एडवोकेट अमोल खोब्रागडे  साहेब, तसेच महिला ऍडव्होकेट श्रुती बोरकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला माननीय पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाच्या वतीने पोलीस हवालदार अरुण पिसे हे हजर होते.  


उपस्थित मान्यवरांनी नॅशनल कंजूमर डे, फॅमिली ला, फॅमिली रिलेशन टू मॅरेज, सक्सेशन सर्टिफिकेट, महिला वरील होणारे अन्याय अत्याचार ,तसेच लहान मुलावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारा अत्याचारा संबंधांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रम  सकाळी - १० -०० वाजता सुरू होऊन ११-३० वाजता सांगता झाली.

 

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता ग्रामपंचायतचे सरपंच श्री बांडे साहेब, तसेच उपसरपंच श्री शेंडे साहेब ,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, तसेच सदस्य आणि मौजा नांदगाव (जाणी)यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सर्व मुलं, मुली आणि शिक्षक वृंद व गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली, जवळपास १५० गावकरी व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !