अमित शहा डॉ.आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात वंचितचे टी पाईन्ट चौकात तिव्र निदर्शने आंदोलन.
एस.के.24 तास
आरमोरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आरमोरी वतीने वडसा रोड टी पाईंट चौक आरमोरी येथे तीव्र निदर्शने करण्यात आले.
गृहमंत्री शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने फॅशन म्हणून आंबेेडकर आंबेडकर असे घेण्यापेक्षा देवाचे नांव घेतले तर सात जन्म स्वर्गात जागा मिळेल, असे मनुवादी वक्तव्य केल्याने तामाम जगभरातील व देशातील डॉ आंबेडकरांना मानणा-या अनुयायांच्या भावना दु:खावल्यामूळे तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
देशाचे गृहमंत्री शहा हे जोपर्यंत आपल्या संविधानीक पदाचे राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभरात तिव्र आंदोलने होणार आहेत. अशा बेजबाबदार गृह मंत्र्याला संविधानीक पदावर राहण्याचा अधिकार नाही.म्हणून वंचित बहुज आघाडी, व भारतीय बौध्द महासभा वतिने आरमोरी तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, आरमोरी विधानसभेचे प्रमुख राजरतन मेश्राम, ज्येष्ठ नेते भीमराव शेंडे, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कुमता मेश्राम महिला आघाडी तालुकाध्यक्ष, लता बारसागडे,संध्या रामटेके, भारती मेश्राम, राधा हुमणे कल्पना ठवरे संप्रति मेश्राम वासुदेव अंबादे मीना सहारे, दुर्गा मेश्राम भावना बारसागडे ज्योती उंदीरवाडे, ताराचंद बनसोड, जगदीश दामले, पुष्पा उमाजी रामटेके, नर्मदा मेश्राम, माधुरी बांबोडे, सिद्धार्थ साखरे, व इतर बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.