स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणारा मंच. - संदीप गड्डमवार
सावली प्रतिनिधी - रोशन बोरकर
*विश्वशांती विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात साजरा*
सावली : स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो.आपल्या अंगी असलेल्या कला प्रदर्शित करण्याची संधी त्यांना प्राप्त होते म्हणून विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केल्या जाते.विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न राहता आपल्या शालेय जीवनातच सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा कारण तुम्हीच उद्याचे भविष्य आहात असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे संदिप पाटील गड्डमवार बोलत होते.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव राजबाळ पा.संगिडवार यांचे हस्ते करण्यात आले.तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या कार्याध्यक्ष रमाताई गड्डमवार,कोषाध्यक्ष डॉ.विजय शेंडे,अंकेषक सुनील बल्लमवार,सल्लागार रितेश जिडगलवार, सदस्या ज्योतीताई शृगांरपवार,प्राचार्य डॉ ए.चंद्रमोली ,तसेच सावली नगर पंचायतचे नगराध्यक्षा लताताई लाकडे,उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार,नगरसेवक विजय मुत्यालवार,सचिन संगिडवाऱ,प्रीतम गेडाम,नितेश रस्से,गुणवंत सुरमवार,प्रफुल वाळके,सीमाताई संतोषवार,अंजली देवगडे,साधना वाढई,ज्योतीताई शिंदे माजी सभापती कृष्णाजी राऊत,भाजपा अध्यक्ष अर्जुन भोयर उपस्थित होते.
व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून सावली पंचायत समिती मधील ग्रामपंचायतीचे सरपंचांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्यात उष्टुजी पेंदोर सरपंच लोंडोली,देवानंद मानकर हरंबा,उषाताई गेडाम चकपिरंजी,विठ्ठल येग्गावार चांदली,सचिन काटपल्लीवार खेडी,राकेश घोटेकर कवठी,विजय गड्डमवार बोथली, गिताताई लाखडे निमगाव उपस्थित होते.स्नेहसंमेलन प्रसंगी नगराध्यक्ष,नगरसेवक आणि उपस्थित सरपंचांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
स्नेह संमेलनाची सुरुवात सहाय्यक शिक्षक शेखर प्यारमवार यांच्या महाराष्ट्र गीताने करण्यात आली. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी विद्यालयामध्ये चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन राजू केदार तर आभार धनंजय गुरनुले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले.