बौद्ध समाजअ-हेरनवरगाव च्या वतीने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०७/१२/२०२४ अ-हेरनवरगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतीरामजी जनबंधू प्रमुख मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक आनंदरावजी रामटेके प्रमुख अतिथी उपसरपंच जितेंद्र क-हाडे, मेजर अरुणजी पिसे,श्री.लोणबलेजी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, विशाल जनबंधू, कैलास क-हाडे,गौतम खोब्रागडे शिक्षक धम्मदीप क-हाडे,माधुरी जनबंधू, संघमित्रा लोखंडे उपस्थित होते.
उपस्थितांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समोर मेणबत्ती,अगरबत्ती,माल्यार्पण करून अभिवादन ,आदरांजली वाहिली.
विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी चे मेजर अरुण पिसे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेली राज्यघटना हा देशाचा कोहिनूर हिरा आहे आणि या घटनेची प्रेरणा घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत शिकणारा माणूस जिद्द व महत्त्वकांक्षेच्या बळावर शिकण्याचा प्रयत्न करुन वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या घेत असतो.
कार्यक्रमाच्या शेवटी त्रिशरण, पंचशील घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,अमरदीप लोखंडे तर आभार गौतम कुमार काळे शिक्षक यांनी मानले.