पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा दिक्षित या गावालगत रोड कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली ला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार.
कमलाकर बुरांडे : ग्रामीण तालुका प्रतिनिधी,पोंभूर्णा
पोंभूर्णा : पोंभूर्णा येथुन जवळच असलेल्या बोर्डा बोरकर येथील रहिवासी मुकुंदा पा.बुरांडे वय,47 वर्ष यांचा उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली ला जोरदार धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला.
सदर घटना काल सायंकाळी सुमारे 6.30 वाजता घडली. पोंभूर्णा वरून दुचाकीने गावाकडे परत जात असताना जवळच असलेल्या बोर्डा दिक्षित या गावालगत एका ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी केली होती.
मुकुंदाजी बुरांडे यांचा अचानक दुचाकीवरून तोल गेल्याने ट्रालीच्या मागच्या बाजूला त्यांची जोरदार धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला.परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या मागे वडील,पत्नी, व दोन मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.