जल जीवन मिशन हर घर जल योजना ठरली फुसका बार.

जल जीवन मिशन हर घर जल योजना ठरली फुसका बार.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,१२/१२/२०२४ केंद्र व राज्य सरकार हिस्सा ९० टक्के व गावातील लोकवर्गणीचे १० टक्के  मिळून जिल्हा पाणी स्वच्छता मिशन अंतर्गत अ-हेर नवरगाव येथे पाणीपुरवठा योजना किंमत रुपये - ०३ कोटी ३८ लाख ४२ हजार ३४९ ची जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग चंद्रपूर द्वारे आर्थिक वर्ष २२-२३ दिनांक ३१/०३/२३ मंजूर करण्यात आली.

सदर योजना मौजा भालेश्वर येथील वैनगंगा नदी पात्रात विहिरी खोदून पाईपलाईन द्वारे गावाला पाणीपुरवठा करणे.सदर योजनेचे काम जिल्हा परिषद,चंद्रपूर पाणीपुरवठा विभागाने कंत्राट दारामार्फत पूर्ण करण्यासाठी ठेका दिला.संबंधित ठेकेदाराने वैनगंगा नदी पात्रात फक्त तात्पुरत्या विहिरी खोदून ठेवल्या आहेत.भालेश्वर वैनगंगा नदी पासून ते अ-हेरनवरगांव पर्यंतचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुद्धा अजून पर्यंत झाले नाही.

सदर कामासंबंधी  जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग ब्रह्मपुरी चे शाखा अभियंता एस.एस.मेश्राम यांचे कडून माहिती घेतली असता सदर बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने आज पर्यंत काम बंद ठेवल्यामुळे त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात आली आहे आणि पूर्ववत काम सुरू करण्यास कळविले आहे.


सदर बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला विचारणा केली असता जे काही नदीपात्रात बांधकाम केलेल्या कामाचे काही पैसे/ रक्कम शासनाकडून मागणी करूनही अजूनही प्राप्त न झाल्यामुळे मजूर वर्गाचे पैसे मला देता येत नाही. मजूर वर्ग काम करण्यास तयार नाही त्यामुळे काम बंद ठेवले आहे.शासन आणि कंत्राटदार यांच्या भांडणात गावकऱ्यांना भारत सरकारच्या स्वच्छ घर घर जल योजनेला मुकावे लागत आहे.


सध्या गावाला नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा गावातीलच एका विहिरीद्वारे होत असल्यामुळे उंच भागावर घर असलेल्या नळ धारकांना पाणी मिळत नाही. त्यांना वणवन पाण्यासाठी एका घरून दुसऱ्या नळ धारकांच्या घरी जावे लागते.सदर पाणी हा जड स्वरूपाचा आहे.


 तरी थंडबस्त्त्यात असलेले जल जीवन मिशनचे हर घर जल योजनेचे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग चंद्रपूर अंतर्गत ब्रह्मपुरी विभागाने लवकरात लवकर नळ योजनेचे काम सुरू करून नळाच्या पाण्यापासून  कोणीही वंचित राहणार नाही आणि प्रत्येकाला मुबलक पाणी मिळेल यासाठी कार्यवाही करावी अशी अ-हेर नवरगाव येथील जनतेची मागणी आहे.


सदर योजनेचे काम लवकर सुरू झाले नाही तर पाण्यासाठी गावकऱ्यांना आंदोलन /मोर्चाचे शस्त्र हाती घ्यावे लागेल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !