वाघाच्या हल्ल्यात महिला ठार कविटपेठ येथील घटना ; स्थानिक जनतेत वनविभाग विरोधात प्रचंड असंतोष.

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार कविटपेठ येथील घटना ; स्थानिक जनतेत वनविभाग विरोधात प्रचंड असंतोष.


एस.के.24 तास


राजुरा : महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राजुरा तालुक्यातील  विरूर स्टेशन वनहद्दितील कविटपेठ येथील शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल दि.२३ डिसे. ला साय. ४:३० वाजता उघडकीस आली मृत महिलेचे नाव लाळूबाई अर्जुन आत्राम (अंदाजे ६५ वर्ष) असे असून सदर महिला शेतात काम करत असताना वाघाने हल्ला करून महीलेला जागीच ठार केले. 


गेल्या महिनाभरापासून या परिसरात वाघाची दहशत कायम आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते म्हणुन परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय असून परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी असून शेतात जाऊन काम करणे शेतकरी व शेती मजुरांना जीवावर बेतनारे ठरत असल्याने शेतकऱ्यांनी काय करावे..? हा मोठा प्रश्न उपस्थित होत असल्याचे परिसरत दिसून येत आहे.


वनविभागाला याची माहिती असतानाही वनविभागाकडून वाघास जेरबंद करण्याची कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने  परिसरातील जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अखेर कविटपेठ येथील सदर शेतकरी महिलेचा निष्पाप नाहक बळी वाघाच्या हल्ल्यात गेला आहे. दरवर्षी शेती हंगामात सुरू असताना वाघाची दहशत कायम असल्याने वनविभाग स्थानिक परिसरातील शेतकरी व मजुरांच्या जीवाशी खेळत आहे.


वनविभागाच्या असंवेदनशील कार्यप्रणालीमुळे आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.सदर वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी स्थानिक जनतेकडून केली जात असून सदर महिलेच्या कुटुंबातील एका व्यक्तीस वनविभागात नोकरीला घेण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

अति संवेदनशील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून ड्रोन कॅमेरा द्वारे वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्वरित वाघाला जेरबंद करून मानव वन्यजीव संघर्ष टाळावे. - मारोती पुप्पलवार शेतकरी,सुब्बई

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !