संशोधन आपल्या जीवनासाठी दिशादर्शक पदव्युत्तर मराठी विभाग कार्यक्रम : डॉ.जगदिश मेश्राम
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२४/१२/२४ संशोधन हे प्रमाणिकपणे केले पाहिजे.समाजाची तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा असते.जे आधीच आहे त्याचा शोध घेऊन त्यापलिकडे जाणे संशोधनात महत्वाचे असते, म्हणून संशोधन हे आपल्या जीवनासाठी दिशादर्शक असते " असे भाष्य डॉ जगदीश मेश्रामांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागातील परिसंवादात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर तर प्रमुख उपस्थितीत डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे उपस्थित होते.याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात डॉ खानोरकरांनी, संशोधन निरंतर चालणारी प्रक्रिया असून जो विषय आपण घेतला त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा सर्वंकष अभ्यास करावा.
संशोधनासाठी आपले कौशल्य पणाला लावणे गरजेचे आहे, यामुळे संशोधन बेरजेचे होईल.असे काव्यमय विचार मांडले.कार्यक्रम प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
प्रास्ताविक व संचालन डॉ.वट्टी तर आभार डॉ. वानखडेनी मानले.कार्यक्रमाला पदव्युत्तर मराठी विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.