अमरदीप लोखंडे श्री छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक
अ-हेरनवरगांव : दिनांक,२२/१२/२४ नागपुर येथील मदत सामाजिक संस्था यांनी सर्वसमभाव कार्यात सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य वृक्षारोपण, सांस्कृतिक, स्वरचित कविता,गीताने,लेखाने जनजागृती व अन्य उपक्रम राबविणे सारख्या कार्याची दखल घेत
ब्रम्हपूरी तालुक्यातील अ-हेर नवरगांव येथील रहिवासी श्री.अमरदीप प्रल्हाद लोखंडे दैनिक लोकमत वार्ताहर व एस.के.24 तास चे सहसंपादक यांना गुरुदेव सेवाश्रम,नागपूर येथे आज पार पडलेल्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन पुरस्कार
वितरण सोहळ्यात पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष श्री.गिरीश भाऊ पांडव संचालक राधिका बाई पांडव चारिटेबल ट्रस्ट,कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार विकास भाऊ ठाकरे व मदत सामाजिक संस्थेचे.सचिव दिनेश भाऊ वाघमारे अॅड. निल लाडे अध्यक्ष मदत सामाजिक संस्था व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात असून अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.