ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा येथे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम व इतर कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न.
अमरदीप लोखंडे सहसंपादक
ब्रह्मपुरी - ३०/१२/२४ ज्ञानगंगा विद्यालय, बेटाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपिय कार्यक्रमा प्रसंगी ज्ञानगंगा विद्यालय , बेटाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , बेटाळा येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी गावकरी यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे मॅडम
तसेच पोलिस हवालदार अरुण पिसे,यांनी उपस्थितांना अपराधापासून बालकाच्या संरक्षण अधिनियम,तसेच अल्पवयीन मुलगा व मुलगी पळून जाने, आई व वडिलांची संमती न घेता घरून पळून जाऊन आपल्याच मर्जीने विवाह करणे,तसेच मोटार वाहन कायदा, जादूटोणा प्रतिबंधक कायदा,बालविवाह कायदा
हुंडा प्रतिबंधक कायदा , आणि नवीन लागू झालेली भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम दुपारी १-३०वाजता सुरू करून २-३० वाजता संपविण्यात आला. जवळपास २०० नागरिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.