खमचेरू येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू.

खमचेरू येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू.

 

एस.के.24 तास


मुलचेरा : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर सोबतच्या व्यक्तीला किरकोळ जखम झाली. हा अपघात मुत्तापूर- सुभाषनगर मार्गावरील खमनचेरू जवळ बुधवार, 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:00 वाजता झाला.



 

रिझवान शेख वय,35 वर्ष रा.आलापल्ली ता. अहेरी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.रिझवान शेख हे चामोर्शी तालुक्याच्या कोनसरीवरून आलापल्ली येथे जात असताना खमनचेरूजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 




यात रिझवान शेख हे जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेला व्यक्ती दूरवर फेकला गेल्याने त्याला किरकोळ मार लागला. विशेष म्हणजे,रिझवान शेख हे दुचाकी चालवत असल्याची माहिती आहे. 




घटनेची माहिती मिळताच आलापल्ली येथील त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली; परंतु रात्री 9:15 वाजे पर्यंतही त्या ठिकाणी शव पडून होते.अशी माहिती मिळाली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !