नागपूर (कन्हान ) येथील मेडिटेशन हॉल जवळील पंटागणात १५१ बुद्ध मुर्तीचे दान कार्यक्रम संपन्न.
★ बुध्दाच्या पावण भुमीत १५१बुद्ध मुर्तीचे वितरण म्हणजे बुद्ध धम्माचा आवाज संपुर्ण देशात गुंजला पाहिजे. - पुज्य भन्ते विनाचार्य दिल्ली
मुनिश्वर बोरकर - नागपूर
नागपूर - थायलंड सारख्या बौद्ध धर्मीय देशाने भगवान बुद्धाच्या पावन पवित्र भुमीत १५१ बुद्ध मुर्तीचे बुद्ध विहाराला दान करीत असतांना आम्ही भन्तेगण धन्य झालो. हा बुद्धाचा आवाज संपूर्ण देशात गुंजला पाहिजे व बौद्ध धम्माचा प्रचार झाला पाहीजे अश्या प्रकारचे मार्गदर्शन पुज्य भंदन्त विनाचार्य नवि दिली यांनी कन्हान येथील बुद्ध मुर्तीच्या दान कार्यक्रमा प्रसंगी केले. इंडो एशियन मेत्ता फांऊडेशन इंडिआ शाखा नागपूर (कन्हान ) येथील मेडिटेशन हॉल जवळील पंटागणात १५१ बुद्ध मुर्तीचे दान कार्यक्रम भन्ते विनाचार्य ,
भदन्त प्रियदर्शी , भंदन्त बुनली महाथेरो थायलंड , भंदन्त रेवत धम्मो , भदन्त खामसिंग थायलंड , भंदन्त अश्वमेध यांच्या उपस्थित तर माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे , शिक्षण महर्षी सुरेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . कार्यक्रमाचे आयोजन नितिन गजभिये आपल्या प्रास्ताविक भाषणात तथागत भगवान बुद्धाचे पवित्र अस्थिकलस यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरवून आज १५१ बुद्ध मुर्तीचे दान कार्यक्रमात सहकार्य सहभागी उपाषकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, अनेक बौद्ध देशातील लोक वर्गणी गोळा करून अष्ट धातुच्या बुद्ध मुर्त्या बनवून भारताच्या बुद्ध भुमीतीलअनेक विहारात दान करतात केवळे मोठे हे फॉरेन देशातील दान. यातूनच इतर बौद्ध धर्माचा देशासोबत बौद्ध मैत्री झाली पाहीजे हाच एकमेव उद्देश होय हि आमच्या साठी मोलाची बाब आहे. बौद्ध धम्माची संकल्पना आपण सर्वांनी बाळगायला पाहीजे. याप्रसंगी शिक्षणमहर्षी सुरेश गायकवाड यांचेही बौद्ध धम्माप्रती मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी धम्मदुत गोपाल रायपूरे , शिद्धार्थ सुमन चंद्रपूर , प्रा. मुनिश्वर बोरकर , ॲड. विनय बांबोळे , वनिता बांबोळे गडचिरोली आदिचा पुज्य भन्ते विनाचार्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन दिनेश शेंन्डे तरआभार स्मिता वाकडे यांनी केले. कार्यक्रमात सुप्रशिद्ध गायक विकास राजा यांचा भिम गिताचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास बहुसंख्य उपाषक - उपाषिका प्रामुख्याने उपस्थित होते.