आपण कुठे चुकलो याचे कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे. - श्री.संतोषसिंह रावत
डॉ.आनंदराव कुळे - मुल शहर प्रतिनिधी
मुल : बल्लारपूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. संतोषसिंह रावत यांचा पराभव झाला. पराभवाची करनेमीमांसा करण्यासाठी दुर्गा माता मंदिर मूल येथील सभागृहात विधानसभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत काँग्रेसचे उमेदवार श्री.संतोषसिंह रावत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सदर निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. विरोधातील उमेदवारांनी या निवडणुकीत धनाचा व प्रशासनाचा गैरवापर करून हि निवडणूक जिंकली खरी आणि त्यामध्ये पक्षातीलच काहींनी काँग्रेसविरोधी प्रचार केल्यामुळे आपला पराभव झाला.
परंतु पुढे आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीत काँग्रेसच्या निष्ठावंतांनाच पक्षाची उमेदवारी देण्यात येईल आणि पुढील निवडणुका संपूर्ण ताकदीने लढल्या जातील. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून जातीय समीकरण न आणता पक्षासाठी बिनधास्त काम करून विरोधकांचा प्रतिकार करावे असे आवाहन चिंतन सभेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी चिंतन बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. घनश्याम मुलचंदानी यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागुण संगठन मजबूत करावे. विरोधकांनी अखेरच्या दोन दिवसात वेगळ्या आयुधांचा वापर करून हि निवडणूक जिंकली. परंतु पुढील निवडणूकांत काँग्रेस पक्षाचा विजय निश्चितच होईल. असे सांगितले.
सदर चिंतन बैठकीत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आलेला अनुभव व झालेल्या चुका स्वीकारून पक्ष संघटन वाढवीण्याकरिता जोमाने कामाला लागणार असा जाहीर संकल्प केला. या चिंतन बैठकीसाठी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.