तिरोडा पोलीस स्टेशन कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. ★ आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.

तिरोडा पोलीस स्टेशन कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. 


★ आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.


एस.के.24 तास


गोंदिया : तिरोडा पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीची प्रेम संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.ही घटना जुलै ते नोव्हेंबर २०२४ दरम्यानची आहे. पिडिताने या संदर्भात पालकांना माहिती दिली. दरम्यान फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. इत्फेखार शेख (३०) रा.हरिओम नगर तिलक वार्ड तिरोडा असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.


तिरोडा पोलीस ठाण्यात इफ्तेखार शेख पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.सदर पोलीस कर्मचारी तिलक वार्ड येथे भाड्याची खोली करून राहतो. त्यातच घरा शेजारच्या एका अल्पवयीन मुलीशी त्याने पाच महिन्यापूर्वी प्रेम सबंध प्रस्थापित केले.दरम्यान आगामी काळात लग्न करण्याचेही आमिष दर्शविले.त्यातूनच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला.यावरून लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. 


फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी इफ्तेखार शेख यांच्याविरुद्ध कलम ६४(ए) ६९(ए) भारतीय न्याय संहिता २०२३ च्या सहकलम ४,६ पोस्को अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोनी.अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोनी.दिव्या बरड व पोहवा. तिरपुडे करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !