उपविभागीय कार्यालयावर धडकला बौध्द बांधवांचा मोर्चा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२४/१२/२४परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आली या निषेधार्थ परभणी येथे काढण्यात आलेल्या मोर्चात एडवोकेट सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांचा पोलिसाच्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केले या तिन्ही घटनेच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी येथे बौद्ध समाज तालुका ब्रम्हपुरी यांच्या वतीने भव्य जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सर्वप्रथम बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे सर्व समाज बांधव एकत्रित येऊन नगरपरिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहून मोर्चास सुरुवात करण्यात आली.
शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला समता सैनिक दलातील सैनिकांनी व समाज बांधवांनी हातामध्ये निळे ध्वज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे फोटो घेऊन घोषणाबाजी करीत बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे, सम्राट अशोक चौक,रेणुका माता चौक,मर्दानल्ली चौक, फवारा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चा येऊन या चौकात गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासून निषेध करण्यात आला व आंदोलन करून त्याच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
त्यानंतर पुन्हा शिस्तबद्ध पद्धतीने ख्रिस्तानंद चौक पासून मोर्चा आगे कूच करीत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला .त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले .यावेळेस मोर्चाचे निमंत्रक प्रशांत डांगे,प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे,डॉ. प्रेमलाल मेश्राम,यांनी मोर्चास संबोधित केले.यावेळेस चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान यांनी मोर्चाला भेट देऊन मार्गदर्शन केले.
त्यानंतर समाजाच्या वतीने परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतिची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावे.,पोलिसांच्या अमानुषपणे मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी हे शहीद झालेले.त्या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करून फाशीची शिक्षा देण्यात यावे.
परभणीतील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यास दोषी ठरवून त्यास बडतर्फ करून फाशीची शिक्षा देण्यात यावी शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्याच्या परिवारातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावे.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमान स्पद वक्तव्य केले अशा अमित शहा वर कारवाई करण्यात यावी.
या मागण्याचे निवेदन मान.राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.देण्यात आले.झालेल्या जाहीर सभेचे सूत्र संचालन सुधाकर पोपटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ब्रम्हपुरी तालुका समता सैनिक दलाचे मुख्य संयोजक डेविड शेंडे यांनी मांडले.
मोर्चा शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यासाठी मोर्चा यशस्वी करण्यासाठी लीलाधर वंजारी,सुरज मेश्राम, नरेश रामटेके, पद्माकर रामटेके, अंकित गोडबोले, विहार मेश्राम,रक्षित रामटेके, नरेंद्र मेश्राम, मनोज धनविज, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील संपूर्ण समता सैनिक दलातील सैनिकांनी व बौद्ध समाज बांधवांनी परिश्रम घेतले.