गडचिरोली जिल्ह्यातील नवतळा येथील युवकाचे सिम वेरिफिकेशनच्या नावाखाली सायबर भामट्याने बँक खाते केले रिकामे.
एस.के.24 तास
सावली : सिम व्हेरीफिकेशन करायचा असल्याचे सांगून सायबर भामट्याने एका ठेकेदाराचे खाते रिकामे केल्याने पाथरी पोलीस स्टेशनं येथे अज्ञात सायबर भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर ढिवरुजी कुणघाडकर,रा.नवतळा,जि. गडचिरोली.कामानिमित्य ह.मु.पाथरी येथे राहत असून हा व्यक्ती सायबर गुन्हेगारांचा बळी पडलेला आहे.
त्याला (06202145639) या नंबर वरून फोन आला त्याने तो उचलताच "मी जिओ केअर सेंटर मुंबई वरून बोलत असून तुमची सिम व्हेरिफाय होणार आहे त्यासाठी तुम्हची सिम बंद करण्यात येईल त्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटांनी कंपनीद्वारे फोन येईल व ते सांगतील त्यानुसार तुम्ही 1 नंबर प्रेस कराल व तुम्हचा आधार कार्डचे शेवटचे चार अंक सांगाल असे सांगितल्यावर काही वेळा नंतर पुन्हा (02235062222)या नंबर वरून कॉल आला व सिम वेरिफिकेशन होण्यासाठी 1 नंबर ची बटण दाबा व बटण दाबताच फोन कट होऊन सिम कार्ड बंद झाले.
त्यानंतर त्याचा दोन तीन अकाउंट असलेल्या खात्या मधून टप्प्या टप्प्याने एकूण 322934 रुपये काढल्याचे लक्षात येताच पाथरी पोलीस स्टेशन रिपोर्ट दिली असता पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्या विरुद्ध कलम (भा.न्या.सं.2023)318(4),(मा.तं.अ.2000).66(क), 66(ड) गुन्हा नोंदविण्यात आला.
मोबाईल ही जीवनावस्तू झालेली आहे तसेच आजचा काळात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे जवळपास सर्वच कामे ऑनलाईन केली जातात मोबाईल आणी इंटरनेट डेटाच्या मादतीने तुम्ही सर्व कामे घरी बसून करू शकता मात्र जेवढ्या सुविधा उत्तम आहेत तेवद्याच समस्यांना या मोबाईलमुळे नागरिकांना सामोर जावे लागत आहे, अनोळखी नंबर वरून कॉल आल्यानंतर बँक खाते रिकामे झाल्याच्या अनेक घटना समोर येत असल्याने नागरिकात प्रचंड भीतीही निर्माण झालेली दिसून येत आहेत.
ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत यात सायबर गुन्हेगार हा वेगवेगळ्या युक्त्या लढवीत असतात जसे सायबर बुलिंग,जुस जैकिंग, सिम वेरिफिकेशसन,बँक खाते अपडेट करणे, अश्लीश व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे,कस्टमर केअर नंबर वरून फोन करणे,फ्री गिफ्टचे आमिष दाखविणे,फेक वेबसाईड, अज्ञात ॲप डाऊनलोड करणे,पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आपल्याला आधार किंवा अन्य कोणतीही माहिती विचारल्यास सांगु नये, तुम्हचा UPI id वर चुकीने पैसे पाठविले आहेत ते परत करायला सांगतील तर उत्तर देऊ नये.
सावध राहण्याकरीता काय कराल : -
फ्री ऑफरला बळी फडू नका,तुम्हची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे टाळा, फेक कॉलला उत्तर देऊ नका, कुणालाही OTP सांगु नका,फेक अँप डाउनलोड करू नका, वारंवार फोन येत असल्यास जवळचा पोलीस स्टेशनला संपर्क करा, किंवा सायबर हेल्प लाईन 1930 या नंबर वर करावे.
सायबर गुन्हेगार यांच्या पासून नागरिकांना सावधगिरी व सतर्क राहण्यांचे आव्हान पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद रासकर यांनी केले