आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेतील सांस्कृतिक कार्यक्रमाने केले.ब्रह्मपुरीकर वाशीयांना मंत्रमुग्ध.

आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेतील सांस्कृतिक कार्यक्रमाने केले.ब्रह्मपुरीकर वाशीयांना मंत्रमुग्ध.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित शाळातील 2983 विद्यार्थ्यांच्या दिनांक 19 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 पर्यंत तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धांतील दुसऱ्या दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी श्री विकास राचलवार यांचे शुभ हस्ते 



श्री.प्रवीण लाटकर प्रकल्प अधिकारी चिमूर यांचे अध्यक्षतेखाली रोषणा चव्हाण मॅडम सहायक प्रकल्प अधिकारी भामरागड डबले सर सहाय्यक प्रकल्प अधिकारी गडचिरोली श्री मच्छिंद्र डुले सहायक प्रकल्प अधिकारी चिमूर कुमारी सायली चिखलीकर सहायक प्रकल्प अधिकारी देवरी कार्यालयीन अधीक्षक श्री.शरद चौधरी सर्व नऊ प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीयांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. 

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मा. अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी  आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शाळांमध्ये सुरू असलेल्या भविष्यवेधी शिक्षण विचार, ब्रायटर माईंड, मेमरी इन्हेंसमेंट, बोलका वर्ग, डिक्शनरी चा वापर, इत्यादी विविध शैक्षणिक उपक्रमांवर आधारित नृत्यांचे सादरीकरण वर्धा प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी  करून उपस्थितांना माहिती दिली.


मोबाईल च्या योग्य वापरामुळे त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम दर्शविणारे नृत्य चिमूर प्रकल्पातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चिंधीचक येथील विद्यार्थ्यांनी सादर केले.स्पर्धेमध्ये इतर सात प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता, आदिवासी संस्कृतीचे जतन इत्यादींवर आधारित नृत्य सादर केले. 


श्री सुरेश मेश्राम ख्रिस्तानंद कॉन्व्हेंट, सौ रश्मी अहेर हिंदू ज्ञानमंदिर,श्रीमती रश्मी झोडे एल.एम. बी.पब्लिक स्कूल,श्री अभिजीत पारकरवार एन एच कॉलेज ब्रह्मपुरी इत्यादींनी सांस्कृतिक स्पर्धांची परीक्षण केले.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला काल आणि आज घेण्यात आलेल्या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.


 कार्यक्रमाचे संचालन श्री.अमोल शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !