मनोरुग्ण अवस्थेमध्ये फिरत व्यक्तीला डोमाजी आधार फाउंडेशन,नांदेड व पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी दिले मनोरुगणास नवजीवन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,१४/१२/२०२४ ब्रम्हपुरी शहरांमध्ये अंदाजे 4 ते 5 महिन्यापूर्वी मनोरुग्ण अवस्थेमध्ये फिरत असलेल्या अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाच्या पुरुषाला डोमाजी आधार फाउंडेशन नांदेड यांचे संचालक परमेश्वर मडावी यांनी त्या मनोरुग्णाला ताब्यामध्ये घेऊन त्यांनी पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पिटल चंद्रपूर येथे नेऊन भरती केले व त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालय ,चंद्रपूर येथे उपचार करण्यात आला.
ही खबर पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले साहेब यांना वैद्यकीय महाविद्यालय ,चंद्रपूर यांनी लेखी पत्राद्वारे दिली व सदर मनोरुग्णाला पुढील उपचारासाठी मेंटल हॉस्पिटल नागपूर येथे नेणे गरजेचे असल्याने त्याकरिता त्याला नेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बानबले साहेब यांनी माजी नगरसेवक दिनकर उर्फ बालू शुक्ला यांची मदत घेऊन नगरपरिषदेच्या वाहनाने सदर मनोरुग्णास आणण्याकरिता सहायक फौजदार अंकुश आत्राम यांची नेमणूक केली.
व त्या मनोरुग्णाला वैद्यकीय महाविद्यालय ,चंद्रपूर येथून आणल्यानंतर माननीय न्यायालयासमोर ब्रह्मपुरी येथे हजर करून माननीय न्यायालयाचे आदेशाने पुढील उपचारासाठी त्या मनो रुग्णास नागपूर येथील मेंटल हॉस्पिटल भरती केले आहे.सदर मनोरुग्ण हा ब्रह्मपुरी शहरामध्ये डोक्याचे केस दाढी वाढली होती तसेच त्याच्या डोळ्याला सुद्धा जखम झाली होती.
त्याची प्रकृती पण एकदम खराब झाली होती अशा खराब अवस्थेमध्ये डोमाजी आधार फाउंडेशन नांदेड चे परमेश्वर मडावी यांनी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले साहेब यांचे मदतीने व पोलीस स्टाफ च्या मदतीने सदर मनोरुग्णास जीवनदान दिले आहे.
त्याला पुढील उपचारासाठी मेंटल हॉस्पिटल नागपूर येथे नगरपरिषद च्या वाहनाने वाहन चालक पोलीस पाटील तलमले राहणार नवेगाव मक्ता यांचे मदतीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश आत्राम यांनी पुढील उपचाराकरिता त्यास भरती केले आहेत त्यामुळे या कार्याची सर्वत्र डोमाजी आधार फाउंडेशन नांदेड चे संचालक परमेश्वर मडावी व पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी चे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले साहेब व अंकुश आत्राम यांचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.