केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ रिपाईचे आंदोलन करून निवेदन सादर.
एस.के.24 तास
चंद्रपूर : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात राज्यसभेत केलेले व्यक्तव हे अपमानजनक असल्याने तमाम भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूर चे वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चंद्रपूर येथे निषेध आंदोलन करून भारत सरकारचा निषेध करण्यात आले.
जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर यांना निवेदन देऊन अमित शहा यांनी भारतीय नागरिकांची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर येथील बौद्ध बांधवानी ग्रामपंचायत च्या आबादी जागेवर उभारलेली बौद्ध प्रतिमा व ध्वज काढून जप्त करण्याची कार्यवाही तहसिलदार चिमुर यांनी केली.
सदर घटना बौद्ध बांधवाच्या भावनांना ठेच पोहचविणारी असल्याने निषेधार्थ शासनाचा निषेध करणारी बाब ठरते त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.तसेच परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यु ही हत्याच असुन यालाही महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री म्हणून पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे यांचाही निषेध करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे,विदर्भ प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सुमन,कार्याध्यक्ष लाजर कांबळे,उपाध्यक्ष कोमल रामटेके,रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर गडचिरोली,एम.डी रायपुरे,रोहिदास रामटेके,रविंद्र पाटिल ' आदि उपस्थित होते.