गगनगिरी देवस्थान जाम खुर्द येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात.
एस.के.24 तास
पोंभुर्णा : दत्त गगनगिरी त्रिवेणी संगम जाम खुर्द येथे दर वर्षी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.हे स्थळ अंधारी व उमा या दोन नद्यांच्या संगमावर एका पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. गगनगिरी महाराजांचे मुख्य मठ रायगड जिल्हयातील खोपोली येथे आहे तसेच मनोरी, गगनबावडा, इत्यादी ठिकाणी महाराजांचे मठ स्थित आहेत कदाचित महाराजांचे काही अस्तित्व या ठिकाणी असावे म्हणूनच सन 2005 पासुन या ठिकाणी महाराजांचे मंदिर उभारण्यात आले.
व हजारोंच्या संख्येने भक्तजन महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागले.तेव्हापासून दत्त जयंतिला महाराजांची पालखी काढण्यात येते व मंदिरामध्ये भजन, किर्तन, प्रवचन, होम हवन केले जाते आणि दत्त जयंतीला महाप्रसादाचा कार्यक्रम होतो हजारोंच्या संख्येनी भक्तजन महाप्रसादाचा आस्वाद घेतात.
याचे श्रेय गेडेकर महाराज,गेडाम महाराज घनश्यामजी टिकले, मायाताई पिपरे, लालाजी बोधलकर, मधुकर टिकले, रमेश घोंगडे, महेंद्र घोंगडे,वसंत टिकले,वसंत नांनगिरवार, डोनुजी बुरांडे व समस्त जाम खुर्द येथील गावकरी मंडळी यांना मिळते.