महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
सावली तालुका प्रतिनिधी - रोशन बोरकर
सावली : समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर 6 डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.महापरिनिर्वाण दिवस भारताच्या सामाजिक जडणघडणीत परिवर्तन करणाऱ्या नेत्याच्या वारशाचा सन्मान करतो.
आज राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालयात सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन करते प्रसंगी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी सभापती पंचायत समिती सावली विजय कोरेवार,नगर पंचायत सावलीच्या अध्यक्षा सौ.लताताई लाकडे,शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईंचवार, सेवा सोसायटी राईसमिल अध्यक्ष मोहन गाडेवार
नगरसेवक प्रफुल वाळके,सचिन संगीडवार,गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.अंजली देवगडे, सौ.ज्योती शिंदे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.सिमा संतोषवार,माजी नगरसेवक विनोद वाळके, रोशन बोरकर, पंकज सुरमवार,कमलेश गेडाम, श्रीकांत बहिरवार, परेश तावाडे काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.