भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे गीताजयंती उत्सव संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,१२/१२/२०२४ दि.११ डिसेंबर २४ ला दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे प.पु. तुकारामदादा गीताचार्य यांची ११० वी जयंती संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय श्री सुबोधदादा मार्गदर्शक व संचालक भु-वैकुंठ अड्याळ टेकाडी, प्रमुख उपस्थित श्री.दिलीपजी भोयर,मुर्लीधरजी गोहणे, श्रीमती उषाताई किनगे बैंगलोर, डॉ. नवलाजी मुळे अध्यक्ष अड्याळ टेकडी, सुश्री. रेखाताई कार्याध्यक्ष अड्याळ टेकडी, सौ. बेबीताई काकडे, सुश्री. गंगाताई इ. मान्यवर उपस्थतीत होते.
सकाळी ११-०० वाजता रामधून काढून गुरूपद गुंफा व पूज्य दादांच्या समाधीचे पुजन करण्यात आले. सत्संग भवन येथे मान्यवरांचे हस्ते अधिष्ठानचे पूजन झाले
सुश्री. रेखाताई यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन केले, विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले, आ, सुबोधदादांनी आपल्या मार्गदर्शनात अड्याळ टेकडीच्या चालू घडामोडी, टेकडीवरील वाढता प्रकाशन मंडळ,व महिलांनी येत्या मकरसंक्रांतीच्या दिवशी चमचे कंगवे न वाटता वानात पुस्तक वाटा असे दादांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
व गीताचार्य तुकाराम दादांना आदरांजली वाहिली, अनेक लोकांनी संकल्प घेऊन पुढील कार्यास सुरुवात केली,आणि योगेश जागेश्वरजी पडोळे मोखारा जी.भंडारा यांच्या नविन गाडीचे पुजन दादांच्या हस्ते करण्यात आले,शेवटी शांतीपाठाणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.