वाचन संस्कृती रुजविण्यासाठी डॉ खानोरकरांचे " पुस्तकाचे घर पुस्तकाच्या घर " उद्घाटन सोहळा. - अशोक पवार

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी डॉ खानोरकरांचे " पुस्तकाचे घर पुस्तकाच्या घर " उद्घाटन सोहळा. - अशोक पवार 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : दिनांक,२६/१२/२४ " आज मोबाईलमुळे लहान व मोठीही मुले लिहणे - वाचणे विसरले आहेत.ग्रंथ आपला मित्र आहे,असे फार कमी लोकांना वाटते.बाबासाहेबांनी ' वाचाल तर वाचाल!' हे सूत्र दिले.वाचन माणसाचे वर्तन सुधारते.वाचनाने इसम व्यक्ती बनून अभिव्यक्त होतो.या कवीमनाच्या डॉ खानोरकराने 'पुस्तकाचे घर (ग्रंथसहवास) तयार करुन वाचनसंस्कृती ते जपत आहेत.

हे अत्यंत अभिनंदनीय आहे.यातील पुस्तके या धनराजचे खरे धन होय,ते वाचनसंस्कृती रुजवणार आहे. " असे मार्मिक भाष्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार अशोक पवारांनी केले.ते येथील कुर्झा वार्डातील डॉ धनराज खानोरकरांच्या 'पुस्तकाचे घर ( ग्रंथनिवास)' सदनिकेच्या उद् घाटनप्रसंगी उद् घाटक म्हणून बोलत होते.

       


या प्रसंगी डॉ.रवी रणदिवे,डॉ राजेंद्र डांगे, डॉ पद्माकर वानखडे,शिवराज मालवी,नंदू गुड्डेवार, अमरदीप लोखंडे,सुकदेव खेत्रे,देवचंद थोटे,सागर घोरमोडे,भुते, किशोर उराडे, घनश्याम खानोरकर,लावण्या खानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.या पुस्तकाच्या घरात विविध प्रकारच्या पुस्तके असून वाचकांनी ती वाचावी.हे निशुल्कपणे वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी चे कार्य सफल व्हावे,असे भाष्य डॉ खानोरकरांनी केले.

      

संचालन व आभार कवी अमरदीप लोखंडेनी मानले. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !