गडचिरोली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेधार्थ वंचित व रिपाईने निवेदन दिले.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली येथे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात राज्यसभेत केलेले व्यक्तव हे अपमानजनक असल्याने तमाम भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने वंचित बहुजन आघाडी व समविचारी रिपाई पक्षाच्या वतीने इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे निषेध आंदोलन करून भारत सरकारचा निषेध करण्यात आला.अमित शहा यांनी भारतीय नागरिकांची जाहीर माफी मागुन राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर घटना बौद्ध बांधवाच्या भावनांना ठेच पोहचविणारी असल्याने निर्षर्धात शासनाचा निषेध करणारी तसेच परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यु ही हत्याच असुन यालाही महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा सुद्धा निषेध करण्यात आला.
केंद्र शासना विरोधी घोषणा व नारेबाजी करण्यात आली.सदर निषेध - आंदोलनात वंचितचे प्रदेश सदस्य बाळू टेभुर्णे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,वंचितचे उपाध्यक्ष जि.के.बारसिंगे 'वंचितचे वरिष्ठ नेते भरत येरमे , जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे,वंचितच्या महिला नेत्या मालाताई भसगवळी,कवळू दुधे,जया रामटेके , बाळकृष्ण बांबोळे 'दिलीप गोवर्धन , अरुण शेन्डे 'समय्या पसुला,गौतम दुधे,जयश्री येरमे
रोशन उके ' जिवन मेश्राम , चरण बारसागडे ,लता लिहीतकर , शेन्द्रे , खंडारे,संगिता पाटिल,खोब्रागडे मॅडमआदि सहीत बहुसंख नागरिक उपस्थित होते.