पोटेगांव येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.

पोटेगांव येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.

   

एस.के.24 तास


गडचिरोली : पोटेगाव येथे भिमज्योती नवयुवक बहुउद्देशिय संस्था पोटेगाव च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला . सुरुवातील ध्वजारोहण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

      


या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्य रंगारी होते .प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर मुंजमकार , सिद्धार्थ गोवर्धन , डॉ. विलास गोवर्धन होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्य रंगारी म्हणाले को डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. 


प्रमुख मार्गदर्शन ज्ञानेश्वर मुंजमकार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करायचे असले तर समाजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ असणे गरजेचे आहे . समाजात स्वार्थी व दलबदलू लोक असल्याने समाजाची अधोगती होत आहे . यावेळी डॉ विलास गोवर्धन,सिद्धार्थ गोवर्धन,विनोद मडावी यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.


त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता देवाजी बांबोळे पोटेगाव यांचे घरी बुद्धामुर्तीची स्थापना करण्यात आली . यावेळी त्रिशरण,पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली . यावेळी पंकज रामटेके , छन्नालाल फुलझेले,धनराज दामले , प्रदिप बांबोळे , महेश वाडगुरे,दिवाकर हलामी


कल्पना फुलझेले, संगिता मुंजमकार , रुशाली गोवर्धन , नेहा मेश्राम , निकीता बांकोळे , मिना रंगारी, निर्मल गोवर्धन , नेहा बांबोळे , प्रिया मुंजमकार , मिना रामटेके , सुमित्रा बांबोळे , अमक्षा गोवर्धन , प्रणय रंगारी , विनय गोवर्धन व - समाजबांधव उपस्थित होते .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !