डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - २८/१२/२४ डॉ.पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ट महाविद्यालय तथा डॉ. पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट ब्रम्हपुरी याच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील शिक्षणप्रेमी, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते व भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख(भाऊसाहेब) यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशजी बगमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे, कॉन्व्हेंटच्या सुपरवायझर सौ. नीलिमा गुज्जेवार, प्रा.एच. के.बगमारे,श्री. गोवर्धन दोनाडकर, निशा मेश्राम, वैशाली सोनकुसरे, निशा गेडाम, प्रियका करंबे, विदया आमले, अस्विता सयाम, प्रतीक्षा निहाटे, जयघोस सहारे ,नूतन ठाकरे, संदेशा रामटेके, संजय नागोसे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताचे माजी कृषीमंत्री तथा शिक्षणप्रेमी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी १९२६ मध्ये श्रद्धानंद छात्रालय व १९३२ साली भारतीय 'प्राथमिक शिक्षक संघ 'स्थापन केले होते. तेवढेच नव्हे तर शिवाजी शिक्षण संस्थेच्या रुपाने संपूर्ण विदर्भातील ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे पसरविले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशजी बगमारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.एस के खोब्रागडे यांनी केले.