सावली तालुक्यातील जिबगाव येथे जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न.
रोशन बोरकर - तालुका प्रतिनिधी,सावली
सावली : दिनांक 5 डिसेम्बर 2024 रोजी जागतिक मृदा दिन प्रसंगी सावली तालुक्यातील मौजा जिबगाव येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक जॉन्सन, भा. प्र. से. यांचे अध्यक्षते खाली तालुका कृषी अधिकारी सावली व ग्रामपंचायत जिबागाव यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा कार्यकमाचे आयोजन करण्यात आले.
प्रसंगी श्री विवेक जान्सन यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीत गुरफडून न रहाता शासकीय योजणांचे माध्यमातून तसेच नवीन तंत्रज्ञाचा अवलंब करून आधुनिक शेतीकडे वळावे व उत्पन्नात वाढ करून जिवनमान उंचवावे असे आव्हान केले.
प्रसंगी श्री दिनेश पानसे, मंडळ कृषी अधिकारी सावली यांनी जागतिक मृदा दिनाचा इतिहास व महत्व विषद करूत मृदेचे मानवी जीवनातील व विकासातील योगदान सांगून मृदेचे संवर्धन व व्यवस्थापन करणे बाबत व शेंद्रीय शेती बाबत तांत्रिक माहीती दिली. श्री सचिन जाधव कृषी पर्यवेक्षक यांनी कृषी विभागाचे विविध योजणांची माहीती दिली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित श्री मधुकर वासनिक, गट विकास अधिकारी,श्री पुरीषोत्तम चूधरी सरपंच जिबागाव व श्री ललित राऊत तालुका कृषी अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशश्विते करीता कृषी विभाग कर्मचारी,ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.