चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे भाड्याने राहणाऱ्या एका अपंग व्यक्तीची गळा चिरुन हत्या ; केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून पसार
एस.के.24 तास
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे भाड्याने राहणाऱ्या एका अपंग व्यक्तीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी(दिनांक.15/12/2024) उघडकीस आली.हत्या केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून पसार झाले आहेत. रशीद अहमद शेख वय,60 वर्ष असे मृताचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील मूळ रहिवासी होते.
रशिद शेख यांनी 12 डिसेंबर ला बुटीबोरी येथील नातेवाईकांना गावाकडे येतो,असे मोबाईलवरुन सांगितले होते.परंतु तीन दिवस लोटूनही ते पोहचले नाही.त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना फोन केला.परंतु मोबाईल बंद होता.त्यामुळे शंका आल्याने नातेवाईक आष्टीत पोहचले.त्यांनी घरी जाऊन बघितले असता खोलीला कुलूप होते.
खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर त्यांना रशिद शेख यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.त्यांचा गळा आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख यांचा खून कोणी आणि कशासाठी केला.आष्टी पोलिस तपास करीत आहेत.