गोरगरिबांचा कामगार प्रभू नामदेव ठेंगरे यांचे निधन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपूरी : १७/१२/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील रहिवासी प्रभू नामदेव ठेंगरे यांचे आज सकाळी ८-०० वाजता वयाच्या अंदाजे ४७/४८ वर्षी आकस्मिक निधन झाले.
प्रभू नामदेव ठेंगरे अ-हेरनवरगांव येथील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून शेतीला खत मारण्यापासून तर औषधी फवारणी, निंदन, खुरपण, धानाचा चूर्णा व इतर कोणतेही कामे तत्परतेने काम करणारा कामगार , शेतमजूर होता.
त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.प्रभू हा कुटुंबातील कमवता ,कर्ता पुरुष होता . त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबावर फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळलेले आहे.