भैसारे दांम्पत्यानी दान दिलेल्या जमीनीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न.
■ संविधान वाचविण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज.हिच बाबासाहेबांना आदरांजली.
प्रा. मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले संविधान आज वाचविण्याची गरज आहे. कारण धर्मांद्ध शक्ती डोके वर काढत आहेत. त्यांसाठी सर्वानी एकत्र येऊन संविधान वाचविण्याची गरज आहे. कृष्णाजी भैसारे - अमिता भैसारे यांनी समाजासाठी दान केलेल्या जमीनीवर वंचित घटक एकत्र आला अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाविषयी काढले.
सम्राट अशोक बौद्ध महिला मंडळ गोकुळनगर येथील पार पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष निशाताई बोदेले ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. मुनिश्वर बोरकर ' भोजराज कानेकर , तुळशीदास सहारे , प्रमोद राऊत , दामोदर शेंन्डे , भरत शंभरकर , हरिदास फुलझेले , भिमराव गोंडाणे , सुभांगी देवगडे , प्रियंका साखरे , डोमाजी गेडाम 'विमलताई चिमुरकर , प्रेमलता कानेकर , भुविका गोवर्धन आदि लाभले होते.
याप्रसंगी भोजराज कानेकर म्हणाले की ' भैसारे दाम्पत्यांनी समाजासाठी दान केलेल्या जमीनीवर मागे पूढे विहार झाले पाहीजे यांची तयारी ठेवा 'प्रमोद राऊत ' निशाताई बोदेले याचेही समायोचित भाषणे झालीत कार्यक्रमास सदर परिसरातील बहुसंख्य बौद्ध बांधव डॉ. आंबेडकरांना मानवंदना देण्याकरीता एकत्र आले होते.