एकनाथ भगत यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०३/१२/२०२४ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार या वर्षी ब्रम्हपुरी येथील रहिवाशी व लोक विद्यालय तलोधी येथील ग्रंथपाल एकनाथ राघो भगत यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आले.
पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शरद पवार सभागृहात रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात संचालक महेश पालकर, सहायक आयुक्त विशाल लोंढे, पीस फुल एज्युकेशनच्या दक्षिण कोरियाच्या सचिव विक्टोरिया, प्रशासन अधिकारी काळे, महिला आघाडीचे राज्याध्यक्ष सुनंदा त्रिगुनायत, संघटनेचे राज्य अध्यक्ष सत्यजित जानराव, सचिव संतोष गायकवाड,शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव, समन्वय समितीचे प्रकाश गोडवे, उपाध्यक्ष रमेश कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्काराबद्दल एकनाथ भगत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.