नवीन वर्षाच्या दिवशीच सावली - मुल महामार्गावर खेडी येथील युवकांचा कारच्या धडकेत मृत्यू.
एस.के.24 तास
सावली : आज दिनांक,01/01/2025 बुधवार नवीन वर्षाच्या दिवशी आज सकाळी 8 :30 वा.सावली वरून दुचाकीत पेट्रोल भरून खेडी कडे जात असतांना अमन बिडी गोडावून समोर विरुद्ध दिशेने मुल कडून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने सावली जवळ असलेल्या खेडी येथील सत्यवान तुळशीराम मडावी वय,42 वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला.
त्यांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचाराकरीता भरती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.आईचा लहानपणीच मृत्यू झाल्याने पत्नी व वडिलांसह खेडी येथे राहत होते.वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक चांगला युवक गमावल्याने खेडीत शोककळा पसरली आहे.
पुढील तपास पोलीस स्टेशन,सावली चे कर्मचारी करीत आहेत.