मैदानी खेळांमुळे मन व मनगट मजबूत होते.आंतर महाविद्यालयीन हॅन्डबाॅल महिला स्पर्धा : अशोक भैया
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२४/१२/२४ " आज सर्वसामान्यांची मुले मैदानावर खेळायला येतात तर श्रीमंतांची मुले मोबाईलमध्ये गुंग आहेत.पी.टी.उषाने अशाच अनेक बाबीवर मात करुन ती आज राष्ट्रीय खेळाडू बनली.देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरले.अशा या मैदानी खेळांमुळे मन व मनगट सबळ होते.
" असे विचार नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैयांनी व्यक्त केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालय महिला हॅन्डबाॅल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद् घाटक म्हणून बोलत होते.
विचार पीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे तर प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य व शारीरिक विभागप्रमुख डॉ सुभाष शेकोकर, डॉ असलम शेख, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम,डॉ के.एम.शर्मा, डॉ किशोर नाकतोडे, डॉ रतन मेश्राम,डॉ युवराज मेश्राम
प्रा आनंद भोयर, डॉ महेशचंद शर्मा, डॉ कुलदीप गोंड इ.मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ गहाणेंनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन शिकत असतांना अशा उपक्रमात आपण भाग घेतल्याने आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होते,असे मार्गदर्शन केले.
संचालन डॉ.के.एम.शर्मा तर आभार संजू मेश्रामनी मानले.यशस्वीतेसाठी क्रीडा समिती पदाधिका-यांनी मोलाचे सहकार्य केले.