ब्रम्हपुरी येथे विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन थाटात.
★ आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेतील सेल्फी पॉईंट ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
ब्रम्हपुरी : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांचे दिनांक 19 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 पर्यंत तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे श्री.रवींद्र ठाकरे अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांचे हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन, ध्वजारोहण व क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
मा.रवींद्र तुकाराम जाधव उपसचिव आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व मा.श्री रवींद्र पांडुरंग गोटे अवर सचिव आदिवासी विकास विभाग, श्री डिगांबर चव्हाण उपयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर, माननीय पवनकुमार बंडगार
कक्ष अधिकारी,श्री साठे साहेब,कक्ष अधिकारी, श्री मोरेश्वर गायकवाड तालुका क्रीडा अधिकारी, श्री विकास राचलवार प्रकल्प अधिकारी चंद्रपूर , श्री नितीन इसोकर प्रकल्प अधिकारी नागपूर, श्री नीरज मोरे प्रकल्प अधिकारी भंडारा, श्री उमेश काशीद प्रकल्प अधिकारी देवरी, श्री प्रवीण लाटकर प्रकल्प अधिकारी चिमूर व नव प्रकल्पातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
नागपूर विभागांतर्गत चिमूर ,चंद्रपूर ,नागपूर, वर्धा ,भंडारा ,देवरी ,गडचिरोली ,अहेरी व भामरागड या नऊ प्रकल्पातील 2983 विद्यार्थ्यांच्या कबड्डी खो-खो व्हॉलीबॉल हँडबॉल या सांघिक खेळांसोबत लांबउडी उंचउडी भालाफेक,थाळीफेक गोळाफेक धावणे व चालणे या वैयक्तिक खेळांच्या उद्घाटन प्रसंगी खेळाडूंनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंंचालन करून मान्यवरांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाप्रसंगी आश्रम शाळा जांभूळ घाट येथील विद्यार्थ्यांनी मराठी सण उत्सव वर आधारित झाकी तर मुलींचे वस्तीगृह ब्रह्मपुरी येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले तर भामरागड प्रकल्पातील लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील विद्यार्थ्यांनी चित्त थरारक मल्लखांब चे प्रात्यक्षिक करून प्रेक्षकांची मन जिंकली.
मा. रवींद्र ठाकरे अप्पर आयुक्त यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणातून खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ब्रह्मपुरी ही कलावंतांची तर चिमूर ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि आपण यावर्षीच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद चिमूर प्रकल्पाकडे सोपविले आहे व त्यांनी क्रीडा स्पर्धा सुरळीत पार पाडण्याची उत्तम तयारी केल्याचे दिसून येत आहे तर विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तम क्रीडा कौशल्याचे दर्शन ब्रह्मपुरीकरांना दाखवावे.
व जिंकण्यासाठी वाद-विवाद न करता तुळशी ने लढा असे आवाहन केले . आयोजकांनी क्रीडा स्पर्धा सोबतच मेमरी इन्हान्समेंट ब्रायटर माईंड बोलकावर्ग, गणितीय क्रिया स्पर्धा, इंग्रजी शब्दकोश स्पर्धा इत्यादी ची शैक्षणिक गुणवत्ता उपक्रम स्पर्धा घेतल्यामुळे या क्रीडा स्पर्धेला वेगळा आयाम आल्याचे मत व्यक्त केले.खेळाडू विद्यार्थी व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनीय प्रसंगा दरम्यान आदिवासी विकास विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना व्हावी यासाठी शैक्षणिक गुणवत्ता उपक्रमाच्या स्पर्धांचे प्रात्यक्षिक मंचकावरून सर्व प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रवीण लाटकर प्रकल्प अधिकारी यांनी अमोल शिंदे यांनी संचलन तर उपस्थितांचे कार्यालयीन अधीक्षक श्री शरद चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा स्पर्धांच्या विविध समित्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान केले.