प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात स्नेहमिलन व सत्कार समारंभ कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : प्रजापिता ब्रह्माकुमारीय ईश्वरीय विश्वविद्यालय , ब्रह्मपुरी येथे दिव्य अनुभूती हालचे नवनिर्माण करण्याच्या प्रित्यर्थ ब्रह्माकुमारीज परिवारातील सर्व भाई - बहिणींसाठी स्नेहमिलन व सत्कार समारंभ तसेच ब्रह्माभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रह्मपुरी ,गडचिरोली,चंद्रपूर, वनी- वरोरा क्षेत्राच्या संचालिका आदरणीय राजीयोगीने ब्रह्माकुमारी कुंदादीदीजी लाभल्या होत्या .तसेच प्रमुख अतिथी म्हणून लालसिंहजी खालसा सर प्राचार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी , ज्येष्ठभ्रता नरेंद्रभाई चंद्रपूर ,महादेव भाई चंद्रपूर
मनोहरभाई वरोरा, ब्रह्माकुमार नरेंद्रजी जीभकाटे भाई , गोवर्धनजी दोनाडकर देशोन्नती पत्रकार तथा सचिव तालुका पत्रकार संघ ब्रम्हपुरी, माजी नगरसेवक मनोज वठे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी स्नेहमिलनाच्या निमित्ताने सर्वांनी आपापले अनुभव कथन केले व ईश्वरीय शक्तीच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने मिळून कार्य केल्यास अशक्य कार्यही कसे शक्य होते .याचे उत्तम उदाहरण म्हणून दिव्य अनुभूती हॉलचं निर्माण कार्य होय असे प्रतिपादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य लालसिंग खालसा सर यांनी संगीताच्या माध्यमातून ईश्वर अनुभूती करणे किती सहज आहे याचा अनुभव कथन केला तसेच मनोहर भाईंनी सुद्धा आपल्या कार्यात्मक अनुभवाचा वृत्तांत सांगितला .ब्रह्माकुमार नरेंद्रभाई चंद्रपूर यांनी सर्व सहयोगी सेवाधारी भाई- बहिणींचा प्रत्येकाच्या कौशल्यानुसार सेवा प्रदान केल्याबद्दल सर्वांचा उमंग उत्साह वाढविला व सर्वांचे अभिनंदन केले..
ब्रह्माकुमार नरेंद्रजी जिभकाटे यांनी याप्रसंगी आपले अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला लाभलेल्या विशेष अतिथींचे शाल ल,श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला .या मध्ये पत्रकार गोवर्धनजी दोनाडकर ,ब्रह्माकुमार नरेंद्रभाई जिभकाटे ,ब्रह्माकुमार मनोहरभाई वरोरा , मनोज वठे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सन्माननीय ब्रह्माकुमारी कुंदादीदींनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले व आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्वांच्या सहकार्याने असंभव कार्य कसे संभव होते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणून सर्वांचे योगदान व परमेश्वराची मदत हेच होय असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाप्रसंगी मान्यवराच्या स्वागतासाठी स्वागत नृत्य प्रस्तुत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्माकुमार स्वप्निल भाई भोसले यांनी सुंदर गीताची प्रस्तुती देऊन सर्वांना मोहित केले प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन ब्रह्माकुमार साई भाईजी अदलवार प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय आरमोरी यांनी अतिशय सुंदर मृदू वाणीने यशस्वीपणे पार पाडले शेवटी सर्वांचे आभार मानण्याचे कार्य ब्रह्माकुमारी बहिणींनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना ब्रह्मा भोजन देऊन एका सुखद कार्यक्रमाचा आनंद व्यक्त करण्यात आला.