सावली वनपरिक्षेत्रातील कवठी परिसरातील शेतात एक बिबटचे पिल्लु आढळले. ★ सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.व्ही.सी.धुर्वे साहेब व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटणास्थळी दाखल.

सावली वनपरिक्षेत्रातील कवठी परिसरातील शेतात एक बिबटचे पिल्लु आढळले.


सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.व्ही.सी.धुर्वे साहेब व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटणास्थळी दाखल.


एस.के.24 तास


सावली : आज दिनांक 24/12/2024 ला सावली वनपरिक्षेत्रातील कवठी या गावातील शेतकरी श्री.अनिल घोटेकार यांचे शेतात कापूस वेचना-या महिला मजुरांना एक बिबटचे पिल्लु आढळले.


ही माहिती सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.व्ही.सी.धुर्वे साहेब यांना देण्यात आली.माहिती मिळताच वनकर्मचारी चमू व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटणास्थळी पोहोचले.


घटनास्थळाची पहानी केली असता 21 ते 25 दिवसाचे बिबट्याचे पिल्लु असल्याचे निर्दशनास आले.त्या पिल्ल्याची आई त्याना रात्री सोबत घेऊन जाणार या हेतूने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्या पिल्ल्याला तिथेच ठेवण्याचा संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांसोबत चर्चा करुन सकाळ पर्यंत प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला..


त्या ठिकाणी चार कॅमेरे पण लावण्यात आले.परंतु आज सकाळी वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी पहानी केली असता ते पिल्लु त्याच ठिकाणी होते व थोडे कमजोर ही वाटत होते.ही माहिती विभागीय वनाधिकारी,चंद्रपूर श्री. प्रशांत खाडे,सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) श्री.व्ही.एस.तरसे यांना देण्यात आली.


त्यांचे मार्गदर्शनात व डॉक्टर कुंदन पोडचलवार यांचे सुचनेनुसार आणि सहाय्यक वनसंरक्षक श्री.पी.पी. खेडकर,वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री.व्ही. सी.धुर्वे साहेब यांचे उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे व सदस्य तन्मयसिंह झिरे यांनी त्या मादि बिबट्याचे पिल्ल्याला सुरक्षितपणे पकडले.


या सर्व कार्यावेळी सावली वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक श्री.आर.जी.कोडापे, पेंढरीचे क्षेत्र सहाय्यक श्री.मेश्राम, वनरक्षक श्री.आर.आर.मुरकुटे,संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य अंकुश वाणी,सम्यक गणवीर,श्रीकांत बिडीकर,संकल्प गणवीर सर्व कर्मचारी चमू उपस्थित होते.पुढील उपचारासाठी त्या पिल्ल्याला टी.टी.सी.चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !