सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे संसदेत भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या देशाचे गृहमंत्री अमीत शहाच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे निषेध आंदोलन.
रोशन बोरकर - ता.प्र.सावली
सावली : देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ काॅंग्रेस पक्षाच्या वतीने सावली येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅनर ला पकडून अमित शहा माफी मागा असे घोषणाबाजी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करून,आंदोलन करण्यात आले.काँग्रेस पक्षाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सर्व समाजसुधारक व भारतीय संविधाना बद्दल अपमानास्पद वागणुक देणाऱ्या केंद्रातील सरकार विरोधात सामाजीक एकतेने लढण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपले हक्क व अधिकार टिकवण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष नितीन गोहने,शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार यांनी दिली आहे.
सदर आंदोलनात महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,माजी सभापती पं.स.विजय कोरेवार,युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे, युवा शहर अध्यक्ष अमर कोणपतीवार,शेतकरी राईस मिल अध्यक्ष मोहन गाडेवार,जेष्ठ पदाधिकारी मुन्ना पाटील भांडेकर,प्रकाश घोटेकर,सुनील पाल,खुशाल राऊत,नगरसेवक
सौ.पल्लवी ताटकोंडावार,नगरसेवक सचिन संगीडवार,श्रीकांत बहिरवार,सौ.कविता मुत्यालवार सौ.निता नरुले,तुळशीदास बाणबले,यादव राऊत,कमलेश गेडाम यांचेसह तालुका/शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महीला काँग्रेस, पक्षाच्या सर्व सेलचे व फ्रंटल आॅर्गनाईजेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.