जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अ-हेरनवरगांवची भालेश्वर देवस्थान ला क्षेत्रीय सहलरुपी भेट.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी - ३१/१२/२४ मावळते वर्ष २०२४ चा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर चे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , अ-हेरनवरगांव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवानंद तुर्काने , शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहविचाराने प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांची क्षेत्रीय भेट या उपक्रमाअंतर्गत शालेय सहल भालेश्वर येथील वैनगंगातीरी असलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रकाश झोतात आलेले देवस्थान या ठिकाणी नेण्यात आली.
क्षेत्रीय सहलरुपी भेटी अंतर्गत देवस्थानच्या पटांगणावर वर्षानुवर्षे अस्तित्वात उभ्या असलेल्या वडाच्या झाडाखाली विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यानंतर भौगोलिक अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून वैनगंगा नदी पात्रात असलेल्या रेती, रेतीगोटा आणि पाणी यांचे महत्त्व शाळेचे मुख्याध्यापक देवानंद तुर्काने,शिक्षक मून,पाथोडे, नाकतोडे, शिक्षिका प्रियंका नीकुरे, नीता गजघाटे,शिल्पा कांबडी,कांचन कांबडी वैष्णवी नागरे यांनी समजावून सांगितले.वैनगंगा नदी चा उगम व काळानुरूप नदीपात्राचा होत असलेला विस्तार याची विस्तृत माहिती मुख्याध्यापक यांनी समजावून सांगितल्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व निमंत्रित पाहुणे मंडळी यांनी उपस्थिती दर्शवून स्नेहभोजनाचा बालगोपाल विद्यार्थ्यांसोबत आस्वाद घेतला.सदर क्षेत्रीय सहलरूपीभेट सहलीच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी शाळेतील अन्न शिजवून देणाऱ्या महिला , शिक्षक , शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले.