तुम्ही ऑलिम्पिकचे खेळाडू बनू शकता. - अर्शिया जुही मुख्याधिकारी
एस.के.24 तास सहसंपादक/ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत चिमूर चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा गडचिरोली आहे भामरागड या नव प्रकल्पातील शासकीय व अनुदानित शाळांतील 2983 विद्यार्थ्यांच्या दिनांक 19 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 पर्यंत तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेत भामरागड 570 गुण घेऊन सर्वसाधारण विजेता ठरला आहे.
तर उपविजेता 173 गुण घेऊन देवरी तुम्ही देखील ऑलम्पिक चे खेळाडू बनू शकता असा आशावाद व्यक्त करताना ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी व्यक्त केला.
खेळाडू विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रोत्साहन देताना भिंतीला बांधलेल्या हत्तीचे उदाहरण देत आपल्या विचारांची व कार्यांची मर्यादा वाढवा असा संदेश देताना भामरागड ची मुलं जिंकू शकतात तर तुम्ही का बरं नाही त्यासाठी मनापासून प्रयत्न करा की ज्यामुळे तुम्ही पुढे जाणार.
चिमूर प्रकल्पाच्या क्रीडा स्पर्धा असून देखील आयोजन हे ब्रह्मपुरीमध्ये केल्या गेल्याने या क्रीडा स्पर्धांचा मी एक भाग बनली आहे हे माझे व ब्रह्मपुरीकरांचे सौभाग्य आहे या क्रीडा स्पर्धामुळे तालुका क्रीडा संकुल चे रूप पालटले असून यापुढे देखील आदिवासी विकास विभागाने अशा प्रकारच्या स्पर्धा येथे घ्याव्यात अशी आशा व्यक्त केली.
श्री प्रवीण लाटकर प्रकल्प अधिकारी चिमूर,श्री विकास राचलवार प्रकल्प अधिकारी चंद्रपूर उमेश काशीद प्रकल्प अधिकारी देवरी डॉक्टर सायली चिखलीकर साहेब प्रकल्प अधिकारी देवरी, श्री.धनराज डबले सहाय्यक प्रकल्प अधिकारी गडचिरोली, श्री मच्छिंद्र डुले सहाय्यक प्रकल्प अधिकारी चिमूर श्री.शरद चौधरी कार्यालयीन अधीक्षक चिमूर इत्यादींच्या शुभहस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले.
विभागीय क्रीडा स्पर्धा पार पाडताना स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी माननीय रवींद्र ठाकरे यांनी चिमूर प्रकल्पाकडे सोपविल्याबद्दल तसेच नव प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी व सहायक प्रकल्प अधिकारी तसेच इतर सर्व कर्मचारी, नगरपरिषद ब्रह्मपुरी, पोलीस विभाग ब्रह्मपुरी, आरोग्य विभाग, ब्रह्मपुरी येथील सर्व विभाग प्रमुखांचे आभार श्री प्रवीण लाटकर प्रकल्प अधिकारी चिमूर यांनी मानले.