यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड तर्फे अपघात झालेल्या विद्यार्थीनी ला आर्थिक मदत.
एस.के.24 तास
गडचिरोली : विहान बहुउद्देशिय संस्था संचालीत तिरंगा मेरी शान प्रकल्पा अंतर्गत मेरा गाव मेरी पहचान,मेरा स्कुल मेरा अभिमाण या परियोजना प्रकल्पाची सुरुवात यशोदा धर्माजी निकुरे यांच्या मरण दिवसा निमित्य 26/11/2023 रोजी सुरुवात करण्यात आली या परियोजना मध्ये गावातील सर्व नागरीक व शाळेचे विद्यार्थी यांना आतापर्यंत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात 50 हजार स्टुडन्ट ला मोफत यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड वितरण करण्यात आले.
या कार्ड चा लाभ ऍक्सरे व प्लास्टर ला झालेला खर्चाला आर्थिक मदत म्हणून 50% रक्कम संस्था देणार त्यात नुकताच जिल्हा परिषद उच्छ प्राथमिक शाळा इंदाळा ता. जी गडचिरोली या शाळेतील पहिल्या वर्गातील कु.पलक धनराज जेंगठे या विद्यार्थीनी च्या हाताला दिनांक 30/11/2024 ला अपघात झालेला आहे असे वर्ग शिक्षक मॅडम पल्लवी जांभुळकर यांनी माहिती दिली.
व मुलीला x-ray व प्लास्टर साठी काही आर्थिक खर्च झालेला आहे व आपण यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड च्या माध्यमातून आज दिनांक 18/12/24 ला अर्धा खर्च विहान बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे व व्हॉइस चेअरमन सौ.मनाली कबिर निकुरे यांनी काही आर्थिक नुकसानी चे भरपाई म्हणून पलक ला नगदी स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली.
संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे, व्हॉइस चेअरमन सौ.मनाली कबिर निकुरे इंदाळा जिल्हा परिषद शाळेचे प्रिन्सिपल साळवे मॅडम,पहिला वर्ग शिक्षिका पल्लवी जांभुळकर मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षा सौ. हिराताई सतीश जेंगठे,पलक चे वडील धनराज जेंगठे व संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत नियमानुसार आर्थिक मदत देण्यात आली.
संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे है नेहमीच कुणाची ना कुणाची मदत करीत राहतात व 2008,पासून सामाजीक कार्यात सक्रीय आहेत हे सर्वांची गोरगरिब असो स्वास्थ ने खचलेले असोत हे मदत करित असतात.संस्थेच्या वतीने आतापर्यंत दुर्धर आजार ग्रस्तचे,जोडप्यांचे लग्न सुद्धा लावुन देतात कोरोना 2020 मधे गरीब लोकांना अन्न धान्य वाटून खूपच मोलाचे काम त्यांनी केले आहे.
हा आर्थिक मदत कार्यक्रम जिल्हा परिषद इंदाळा शाळेच्या आवारात पार पाडण्यात आला यावेळी कार्यक्रमात उपस्थित विहान बहुउद्देशिय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे संस्थेचे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.