होमगार्ड पथक ब्रम्हपुरी यांच्या वतीने होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,१६/१२/२४ होमगार्ड पथक ब्रम्हपुरी यांनी होमगार्ड वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता.वर्धापनदिना प्रसंगी चंद्रपूर जिल्हाचे होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक मा.रिना यादवराव जनबंधु मॅडम,प्रशासकिय अधिकारी - नंदा सुर्यवंशी मॅडम, व केंद्र नायक नरेश राहुड साहेब,यांचे मार्गदर्शनाखाली,होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
त्या वेळी ब्रम्हपुरी पथकातील,तालुका समादेशक अधिकारी - एम. बी. पठाण साहेब यांचे उपस्थितीत, शहरातुन होमगार्डचे रुठ - मार्च, व ग्रामपंचायत बोरगाव येथे ग्रामस्वच्छता अभियान व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्या करिता, ब्रम्हपुरी पथकातील महिला व पुरुष सैनिक तसेच बोरगाव येथील सरपंच मेघाताई कवडूजी पिंपळकर, ग्रामपंचायत सचिव गोपाल गावतुरे पोलीस पाटील खुशालजी मैद,अंगणवाडी शिक्षिका तोंडरे बाई ,ग्रा.प.कर्मचारी ढोरे तसेच
पथकातील सैनिक चंद्रशेखर बावनकुळे, विनोद लाखे, महादेव ठेंगरे,दिलीप तोंडरे, कवडू पिंपलकर, दिलवर राऊत,प्रीतम बागडे,शालू कोसे, कविता कुरझेकार,तसेच सर्वपथकातील पुरुष व महिला होमगार्डनी, उपस्थित राहुन सहकार्य केले.