शेतकऱ्यांनाव ४० हजार रुपये बोनस सरसकट जाहिर करा. - वंचित बहुजन आघाडी चे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन.
एस.के.24 तास
वडसा : देसाईगंज - ऐन धान मळणी च्या कालावधित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडनुका घेण्यात आल्याने धान खरेदी विक्री सोसायट्यांची धान खरेदी बंद होतीशेतकऱ्यांना आपले धान खाजगी व्यापार्यांना विकावे लागले खरेदी केन्द्रे उशिरा सुरु झाल्याने शेतकरी शासकिय हमीबभावापासुन वंचित राहु शकतो.
सतत ची नापिकी वाढते मजुरीचे दर आणि रासायनिक खताच्या वाढत्या किमती मुळे शेतकर्यांची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. यावर उपाय योजना म्हनुण राज्यसरकार ने शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ४० हजार रुपये बोनस जाहिर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतिने निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली.
सतत ची नापिकी निसर्गाचा लहरीपणा वाढते मजुरी चे दर रासायनिक खताच्या वाढत्या किमती यामुळे शेती व्यवसाय परवडण्या सारखा राहिलेला नाही.आजही शेतकरी आत्महत्या करतांना चे चिञ महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे.यावर्षी ऐन धान मळणी च्या हंगामात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडनुका घेण्यात आल्या आचार संहिता सुरु असल्याने शासकिय धान खरेदी विक्री सहकारी संस्था उशिरा सुरु झाल्या.
बर्याच शेतकऱ्यांना आर्थिक अडचनी मुळे आपले धान खाजगी व्यापार्यांना विकल्यामुळे त्यांना हमिभाव योजनेचा लाभ मिळणार नाही परिणामी त्यांची आर्थिक स्थिती मजबुत होणार नाही नफ्या तोट्याची परवा न करता नेहमी निसर्गाशी दोन हात करत शेती व्यवसाय करुन धान उत्पादन करणार्या शेतकर्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने हेक्टरी ४० हजार रुपये सरसकट बोनस धान उत्पादक शेतकर्यांना जाहिर करावा.
अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंञी मा. देवेंद्र फडनविस यांंना उपविभागिय अधिकारी कार्यालय देसाईगंज च्या वतिने आज देण्यात आले.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम , महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा निमगडे प्रा भिमराव शेन्डे तालुका अध्यक्ष विनोद मेश्राम , भाग्यवान बन्सोड रुपेश सुखदेवे नानाजी कर्हाडे मोहन घायवान कुमता मेश्राम लता बारसागडे दुर्गा मेश्राम मिना सहारे राधा हुमने शिवदास बन्सोड प्रविण रामटेके दिलिप बन्सोड उमाकांत बन्सोड स्वप्निल मेश्राम छगन बन्सोड यांचेसह वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते ।