श्री.तिरूपती बालाजी देवस्थान चुनाळाच्या सामाजिक उपक्रमामुळे १२९ मोतिबिंदू रूग्णांना मिळणार दृष्टी.
★ दरवर्षी आयोजित केले जाते मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.
एस.के.24 तास
राजुरा : चुनाळा येथील श्री तिरूपती बालाजी देवस्थानाच्या एकोणिसाव्या ब्रम्होत्सव सोहळयाअंतर्गत परिसरातील अंध रूग्णांना दृष्टी लाभावी याकरीता दरवर्षीप्रमाणे मेडीकल कॉलेज सेवाग्राम च्या सहकार्याने आयोजित मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात २७२ रूग्णांची तपासणी करण्यात आली त्यातील १२९ रूग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेस पात्र ठरले असून या सर्वांना देवस्थानाच्या या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दृष्टी मिळणार आहे.
मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटन सोहळया प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ए. सि. बी. कंपनीचे व्यवस्थापक राजबिरसिंग तवर, उदघाटक राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक जाधव,मुख्य अतिथी देवस्थांचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, नेत्र तज्ञ डॉ प्रीतम भैसारे, डॉ मनोज शेंडे, डॉ लांजेवार, वेकोलीचे एरीया प्लॅनींग आफीसर श्रीपुरम चक्रवर्ती, देवस्थानचे सचिव वाय राधाकृष्ण, बल्लारपूर चे मेंदू तज्ञ डॉ प्रशिक वाघमारे,
राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज, क्षेत्र सहायक अधिकारी प्रकाश मत्ते, सरपंच बाळनाथ वडस्कर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती संजय पावडे, अंबुजा सिमेंट चे सिद्धेश्वर जंपलवार, ग्रा.पं सदस्य संतोषी निमकर, वंदना पिदुरकर, राकेश कार्लेकर, पोलिस पाटील रमेश निमकर, मनोहर निमकर, देवस्थानचे संचालक , मनोज पावडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावीकातून देवस्थान कमेटीचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले देवस्थान कमेटीच्या वतीने फक्त धार्मिक विधी न करता परिसरातील गोर-गरीब जनतेची सेवा करण्याचा मानस देवस्थानाचा आहे. दर वर्षी या ब्रम्होत्सव सोहळयाच्या माध्यमातून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्य करणे आमचे कर्तव्य आहे. त्याकरीता रक्तदान शिबीर, भोजनदान, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
मागील सतत एकोणवीस वर्षापासून हे मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन देवस्थानाच्या माध्यमातून केल्या जात असून मोठया प्रमाणात रूग्णांना याचा लाभ होत आहे याचा देवस्थान कमेटीला अभिमान आहे. मेडिकल कॉलेज सेवाग्राम सह इतर सामाजिक संस्थांनी सहकार्य केल्यास असे उपक्रम देवस्थानाच्या वतीने पुढेही मोठ्या प्रमाणावर राबविल्या जाईल.
सदर शिबीरात परिसरातील रूग्णांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. त्यात जवळपास २७२ रूग्णांनी तपासणी करून १२९ रूग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. या सर्व रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी दिलेल्या तारखांत सेवाग्राम येथे नेऊन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबीरात रूग्णांची तपासणी मेडीकल कॉलेज सेवाग्राम चे नेत्रचिकित्सक डॉ. अजाबराब धाबर्डे, डॉ अजहर शेख, डॉ प्रांजल जैन, डॉ मयुर आईलवार, समाजसेवक सचिन ताकसांडे, सुशिल वाणी यांनी केली असून माणिक पिंगे, सुरेश सारडा, अशोक शाह,शंकरराव पेद्दुरवार, सुरेंद्र निमकर यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदिप बोबडे यांनी मानले तर याप्रसंगी मोठया संख्येनी रूग्ण, त्यांचे नावेवाईक, भावीक भक्त व परिसरातील जनता उपस्थित होती.