भव्य मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१/१२/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील 50 की.मी. अंतरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र मूडझा येथे दि.३०/११/२४रोज शनिवारला नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील एकूण१७५ नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकूण ८० नेत्ररुग्णांची निवड मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली. या सर्व नेत्र शस्त्रक्रिया विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे कृत्रिम भिंगरोपण (लेन्स) या पद्धतीने करण्यात येणार आहेत.
नेत्रशिबिर यशस्वी करण्याकरिता समता फाउंडेशनचे आरोग्य अधिकारी श्री आकाश निकुरे सर यांनी सहकार्य केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुडझाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य झलके व डॉ.दर्शना भुते तसेच सर्व सीएचओ, आरोग्य सेवक,सेविका, आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले.
शिबिरात उपस्थित सर्व नेत्र रुग्णांची तपासणी नेत्र चिकित्सा अधिकारी वाय. आर. रामटेके यांनी केली. तसेच नेत्र शिबिरात उपस्थित सर्व नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियापूर्व व शस्त्रक्रिया पश्चात डोळ्यांची निगा कशी राखावी याबद्दल आरोग्य शिक्षण व समुपदेशन करण्यात आले. या शिबिराचा मुडझा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.