चालकाच्या सतर्कतेने वाचले प्रवाशाचे प्राण धावती बस उतरली रस्त्याच्या कडेला सावली येथील घटना.
सावली प्रतिनिधी - रोशन बोरकर
सावली : बसस्थानकावरुन सुटलेली पुलगाव - गडचिरोली ही बस शहरापासुन अवघ्या 2 किमी अंतरावर असलेल्या आर.एस.बार जवळ चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरुन कळेला उतरल्याची घटना (दि.01) रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.
सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. चालकाच्या सतर्कतेने बस मधील 20 ते 25 प्रवाशाचे प्राण वाचले.गत दोन दिवसापुर्वी गोंदिया येथे बसच्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्युची घटना घडली होती. हि घटना ताजी असतांनाच आज एमच 13 CU 8334 या क्रमांकाची पुलगाव गडचिरोली ही बस सावली बसस्थानकावर आली. बसस्थानकावरुन प्रवाशी घेवून बस गडचिरोलीकडे जाण्यासाठी निघाली असता बस मध्ये स्टेअरिंग रॉड काम करणे बंद केल्याने बस चालकाने सदर बस ही गडचिरोली चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कळेला उतरवली.
त्यामुळे बसमधील 20 ते 25 प्रवाशांचे प्राण वाचले. यात एक प्रवासी किरकोळ जखमी झाला तर बसमधील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.बस चालक प्रदिप सिरसाट यांना सदर बसमधील तांत्रिक बिघाड लक्षात येताच सतर्कतेने बसला रोडच्या कडेला उतरविले व सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली असुन पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.